सावंतवाडी,दि.०२: तालुक्यातील ओवळीये गांगोबा मंदिर ते खालची वाडी रस्त्याचे आज आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मंडगावकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
गावचे माजी उपसरपंच सागर सावंत यांनी हा रस्ता व्हावा यासाठी वेळोवेळी या विभागाचे भाजपा आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांचे लक्ष वेधले होते.अखेर आज गांगोबा देवस्थान ते खालचीवाडी या रस्त्याचे भूमिपूजन झाल्याने येथील नागरिकांनी गावातील युवा कार्यकर्ते सागर सावंत, मनोज सावंत, विनायक सावंत यांचे आभार मानले.
यावेळी सागर सावंत,मनोज सावंत,अब्जु सावंत, सरपंच सौ.तारामती नाईक,सर्व ग्रामपंचायत सदस्य,भिवा सावंत,राजन राणे,सुनील राऊळ,संजय मडगावकर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.