तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता…
मुंबई,दि.२९: विधानसभा निवडणुकीत महायुतीची एक हाती सत्ता आल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी च्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.
महायुतीतील भाजप पक्षाने सर्वाधिक जास्त जागा जिंकल्या असल्याने त्यांच्या पदरात मुख्यमंत्री पद पडण्याची शक्यता वर्तवली जात असून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील अशी माहिती आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देणार असल्याची माहिती अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत समोर येत आहे.
दरम्यान महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांचा योग्य तो सन्मान केला जाईल अशी माहिती भाजपा वरिष्ठांकडून देण्यात आली आहे.