विश्व हिंदू परिषद,बजरंग दल व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..

0
17

जवळपास ४७ जणांनी या शिबिरात घेतला सहभाग..

दोडामार्ग,दि.२१: विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा-दोडामार्ग तर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्था दोडामार्ग येथे आयोजित रक्तदान शिबिरास ४७ जणांनी सहभाग नोंदविला.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलचे निळकंठ फाटक (संयोजक बजरंग दल), सिद्धनाथ नाटेकर ( सहसंयोजक बजरंग दल), निलेश साळगावकर (प्रखंड मंत्री वि. हीं. प.), झीलू गवस (सह प्रखंड मंत्री वि. हीं. प.), कु.हर्षदा राजपुरोहित (दुर्गा वाहिनी जिल्हा संयोजिका), मनोज वझे (जिल्हा कार्यकारिणी सदस्य) सिंधु रक्तमिञ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चे सावंतवाडी व दोडामार्ग विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, दोडामार्ग सहसचिव वैभव रेडकर, प्रसिद्धी प्रमुख भूषण सावंत उपस्थित होते.

दरम्यान कुंब्रल, आंबेली, तळेखोल, सोनावल, घोटगे, भेडशी, साटेली, हेवाळे, गिरोडे, मणेरी, दोडामार्ग शहर, साळ पुनर्वसन भागातील सर्व बजरंगीनी तसेच रक्तदात्यांनी उस्फुर्त उपस्थिती लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here