सावंतवाडी ,दि.१५: येथील यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने सिव्हिल शिक्षकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. ‘रिसेंट ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग’ या विषयावर आधारित या कार्यशाळेत संपूर्ण राज्यातून ४९ शिक्षक सहभागी झाले होते. सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींबद्दल माहिती यावेळी देण्यात आली.
तज्ञ् मार्गदर्शक म्हणून डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, पुणे येथील सिव्हिल विभाग प्रमुख डॉ.अशोक मोरे, यशदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथील सिव्हिल विभाग प्रमुख डॉ.अभिजित झेंडे, सीओईपीचे प्राध्यापक डॉ.साहिल साळवी आणि बाटू विद्यापीठाच्या सिव्हिल विभागाचे प्राध्यापक डॉ.एस.आर.भगत उपस्थित होते.
शिक्षकांमध्ये नवीन कौशल्ये विकसित होण्यासाठी व विद्यार्थ्यांना अद्ययावत घडामोडी शिकवता येण्यासाठी या कार्यशाळेचा नक्की उपयोग होईल असा विश्वास कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे यांनी उदघाटन प्रसंगी व्यक्त केला. यावेळी उपप्राचार्य गजानन भोसले, सिव्हिल विभागप्रमुख प्रसाद सावंत, समन्ववयक पार्थ नाईक व सहसमन्वयक हवाबी शेख आदी उपस्थित होते.