सावंतवाडी,दि.२३ : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत बाळासाहेब प्रेमी शिवसैनिक म्हणून सर्वत्र ख्याती असलेले माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपली सच्ची श्रध्दा आजही जोपासली असून,सोमवारी पाळणेकोंड येथील बाळासाहेबांच्या कल्पवृक्ष स्मारकास्थळी साळगावकर यांच्यासह शिवसैनिकांनी जाऊन तेथे ते नतमस्तक झाले.
साळगावकर यांनीच हे बाळासाहेबांच्या नावाने कल्पवृक्ष काही वर्षापूर्वीच उभारले होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती प्रत्येक शिवसैनिक वेगवेगळ्या पध्दतीने साजरी करत असतो.
सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर ह्यांनी ही अनोखी परंपरा कायम टिकवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. बाळासाहेबांच्या नावाने पाळणेकोंड धरणावर उभारण्यात आलेले ब्रम्हा, विष्णू, महेश हे कल्पवृक्ष आज डौलाने उभे असून बाळासाहेबांच्या जंयती ला शिवसैनिक आर्वजून तिथे भेट देत असतात.
त्याच प्रमाणे आज बाळासाहेबांच्या जयंतीचे अवचित्य साधून शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल परुळेकर, यांच्यासह माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, सिताराम गावडे, संदीप टोपले,माजी शहर प्रमुख जावेद शेख, बावतीस फर्नांडिस, महेश नार्वेकर, गणपत बांदेकर, सुधीर पराडकर, संदीप टोपले, बंड्या तोरसेकर, संतोष जोईल, रवी जाधव, दीपक सावंत, सुधाकर राणे, सुभाष पोकळे या ज्येष्ठ शिवसैनिकांनी धरणावर जाऊन या कल्पवृक्षाला नतमस्तक होत बाळासाहेबांना अभिवादन केले आहे.
ब्रह्मा,विष्ण, महेश स्वरूपात हे कल्पवृक्ष उभे असून बाळासाहेबांचे जिवंत स्मारक आहे.