शिरशिंगे ते शिवापुर रस्त्या संदर्भात २६ जानेवारी रोजी होणारे आंदोलन तूर्तास स्थगित..

0
146

कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी जागेचा प्रश्न निकाली लागल्यानंतर तात्काळ निधी मंजूर करण्याचे दिले आश्वासन..

सावंतवाडी,दि.२४: सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्याला जोडणारा शिरशिंगे शिवापुर असा रस्ता गेली पाच वर्षाहून अधिक काळ रेंगाळलेला आहे सदरचा रस्ता साडेतीन किलोमीटर वन संज्ञा जमिनीमध्ये अडकला असून हा रस्ता झाल्यास दोन तालुक्यांनी गावे एकमेकाला जोडली जाणार आहेत आणि ऐतिहासिक मनोहर मन संतोष गडाला महत्त्वकांक्षा हा असा हा मार्ग असून मंत्रालय स्तरावर वन संज्ञा जमीन संदर्भात बैठका होऊनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने अखेर दोन्ही गावच्या व पंचक्रोशीच्या नागरिकांनी येत्या २६ जानेवारीला व्यापक आंदोलन उभारण्याचे निश्चित केले होते, मात्र आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्याशी झालेल्या दोन्ही तालुक्याच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत हा रस्ता वन संज्ञा जमीन प्रश्न येत्या महिन्याभरात पूर्ण करून लवकरच हा ऐतिहासिक मार्ग चे काम हाती घेण्याचे आश्वासन श्रीमती चव्हाण यांनी दिले, त्यामुळे सदरचे व्यापक आंदोलन तीन मार्चपर्यंत स्थगित ठेवण्याचे शिष्टमंडाने स्पष्ट केले आहे. दोन्ही तालुक्याच्या गावातील शिष्टमंडळात माजी सभापती मोहन सावंत सावंतवाडी चे माजी सभापती रवींद्र मडगावकर, शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ, शिवसेनेचे विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण पेडणेकर, अंकुश परब आदी उपस्थित होते.

सन २०१८- १९ रोजी या रस्त्या संदर्भात पहिले व्यापक आंदोलन पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम समोर छेडले होते. मात्र त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी मुंबई स्तरावर वन संज्ञा जमीन प्रश्नसंच बैठकीचे आयोजन केले मात्र करोनाचा काळ त्यामुळे हा मार्ग हा रस्त्याचा प्रश्न सुटला नव्हता मात्र आता हा रस्ता व्हावा या मागणीसाठी शासन स्तरावर आणि संबंधित खात्यासमोर झगडूनही कोणताच न्याय मिळत नसल्याने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता त्या पार्श्वभूमीवर आज या शिष्टमंडाची बैठक सार्वजनिक बांधकामकाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी सदर वन संज्ञा ची जागा ३.७ किलोमीटर ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागण्यात आली, होती परंतु सदर वनविभागाने हिरे गावातील ती जमीन रोपवन साठी योग्य नाही असे स्पष्ट केल्याने हा प्रश्न अनुत्तरीत राहिला मात्र आता जिल्हाधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात तहसीलदार यांना सदर वन सज्ञा वन जमिनीची पर्यायी जागा उपलब्ध करून द्या असे स्पष्ट केले आहे.त्यामुळे येत्या ३० जानेवारीपर्यंत सदर तालुक्याचे तहसीलदार या संदर्भात निर्णय देणार आहेत त्यामुळे जागेचा प्रश्न निखाली निघाल्यानंतर तात्काळ सदर ३.५ किलोमीटर अंतरावर रस्त्यासाठी निधी मंजूर करून तात्काळ रस्त्याचे काम हाती घेण्याचे आश्वासन चव्हाण यांनी दिले आहे. त्यामुळे सदरचे आंदोलन आम्ही स्थगित ठेवत असल्याचे सिस्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.सदर प्रश्न जर ३ मार्च पर्यंत कोणतीच कार्यवाही न झाल्यास वनविभाग महसूल बांधकाम या तिन्ही कार्यालयासमोर या भागातील व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here