मल्ल सम्राट प्रतिष्ठान व अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा आयोजित कोलगाव येथील मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

0
19

सावंतवाडी,दि.२०: येथील सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच योगदान देणाऱ्या मल्लसम्राट प्रतिष्ठान, सावंतवाडी तसेच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवाच्या वतीने कोलगाव येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा तसेच मोफत औषध वितरण शिबिराला कोलगाव येथील नागरिकांचा व पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल ३०९ रुग्णांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून मोफत औषधे देखील घेतली. प्रारंभी शिबिराचे उद्घाटन अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर, कोलगावचे सरपंच संतोष राऊळ, मल्लसम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सचिव पैलवान ललित हरमलकर, खजिनदार पै . गौरव कुडाळकर तसेच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा येथील वैद्यकीय टीमचे प्रमुख डॉ. राजेश ऊईके, डॉ. योगेश शिंदे, डॉ. अंकिता मसुरकर, डॉ. दत्तप्रसाद पवार, डॉ. प्रसाद नार्वेकर, डॉ. रेश्मा राजीवन, अजय ब्रदर तसेच स्टाफ नर्स सुमा नाईक, हर्षदा मांजरेकर, दिग्विजय राणे, समीर पावने, गिरीश नाईक, रमाकांत भाईप यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी मान्यवरांचा सत्कार पर्यावरण संवर्धंनासाठी आवश्यक असणारे वृक्षाची रोपे देऊन मल्लसम्राट प्रतिष्ठानच्या प्रतिनिधींद्वारा करण्यात आला.

यावेळी उपस्थित ॲड. नकुल पार्सेकर म्हणाले, समाजात वावरत असताना सामाजिक बांधिलकी जोपासून जनसामान्यांच्या आरोग्यासाठी झटणे ही काळाची गरज आहे. मल्लसम्राट प्रतिष्ठानचे कार्य अतिशय कौतुकास्पद असून त्यांच्या कार्याचा आदर्श इतरही सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्या संस्थांनी घ्यावा, असे नमूद करून मल्लसम्राटच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सरपंच संतोष राऊळ यांनी सांगितले की, कोलगावसारख्या ग्रामीण भागात जनसामान्यांच्या आरोग्यासाठी झटणारे मल्लसम्राट प्रतिष्ठान हे अतिशय विधायक कार्य करत असून सामाजिक कार्यात ग्रामपंचायत स्तरावरून नेहमीच आपण त्यांना सहकार्य करू. तसेच आगामी काळातही त्यांनी असेच आरोग्य शिबिरे घेऊन ग्रामीण भागातील लोकांची सेवा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. राजेश ऊईके यांनी सांगितले की, धारगळ गोवा येथे अखिल भारतीय आयुर्वेद संस्था मागील दोन वर्षांपासून आयुर्वेद क्षेत्रातील अतिशय महत्त्वपूर्ण कार्य करत असून सावंतवाडी आणि सिंधुदुर्गातील विविध रुग्णांना त्याचा लाभ मिळत आहे.

संस्थेद्वारा गोरगरीब लोकांची व गरजू रुग्णांची सेवा केली जात असल्यामुळे सिंधुदुर्गातील नागरिकांनी संस्थेच्या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगीत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव ललित हरमलकर यांनी केले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन फिजा मकानदार यांनी केले.

आरोग्य शिबीर यशस्वीतेसाठी मल्लसम्राट प्रतिष्ठानचे शिलेदार अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सेक्रेटरी पै. ललित हरमलकर, सहसेक्रेटरी फिजा मकानदार, खजिनदार पै. गौरव कुडाळकर, कामाक्षी महालकर, साबाजी परब ( पब्लिक रिलेशन ऑफिसर ), दशरथ गोंड्याळकर, बुधाजी हरमलकर, कृष्णा हरमलकर, नागेश सूर्यवंशी, दिपाली राऊळ, विघ्नेश बोंद्रे, देवेश पालव, कुणाल परब, आदित्य हरमलकर, मृणाल शिरोडकर, आयान शेख, नासिर मकानदार , बेबी फातिमा मकानदार, संचिता केनवडेकर , गणेश राऊळ, नेहा ढोले, गणेश हरमलकर, दिनेश हरमलकर यांनी तसेच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवाच्या सर्व वैद्यकीय टीमने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here