कळसुली येथील उबाठा कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश..

0
16

आ.नितेश राणे यांच्या उपस्थित ओम गणेश निवासस्थानी केला प्रवेश

कणकवली,दि.२१: तालुक्यातील कळसुली सुद्रिकवाडी येथील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी आमदार राणे यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये गंगाराम दाजी सुद्रिक, रमेश विलास सुद्रिक, आशिष दिनेश सुद्रिक, अमय दिनेश सुद्रिक, विजय सुद्रिक संतोष सुद्रिक, श्रीरंग सुद्रिक, नंदकिशोर सुद्रिक, सिताराम सुद्रिक, शरद सावंत, सिद्दिकेश परब, संदेश सुद्रिक, प्रवीण सुद्रिक अधिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

यावेळी कळसुली सरपंच सचिन पारधिये , जयवंत गावकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here