सरमळे माजी सरपंच अर्जुन गावडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश..

0
53

सावंतवाडी,दि .१७: तालुक्यातील सरमळे गावचे माजी सरपंच आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व गावात प्रत्येकाच्या सुख दुःखात सामील होणारे असे आदर्श व्यक्तिमत्त्व अर्जुन गुणाजी गावडे यांनी सौ.अर्चनाताई घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश प्रवेश घेतला.
प्रवेश करते वेळी गावडे म्हणाले अर्चना ही आमची मुलगी आहे आणि तिचे आजचे तळागाळातील कार्य पहाता त्यांची वाटचाल ही खूप लोकांना प्रेरणा देणारी व महिलांना आदर्शदायी अशी आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी आपण कटिबद्ध राहून येत्या निवडणुकीत त्यांना विजयी करणार असल्याचे बोलले.

यावेळी त्यांच्या समवेत रामदास सावंत , सावंतवाडी शहराध्यक्ष देवा टेमकर , नंदकिशोर साटेलकर , विनायक परब ,सावंतवाडी विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस व आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here