रतन टाटा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही सोहळे साजरे करू नयेत अशी जनतेला केली विनंती
सावंतवाडी, दि.१४: रतन टाटा यांच्या प्रेरणेतून आपण आपले औद्योगिक विश्व साकारले असून त्यांच्या आदर्शांवर आजवरची वाटचाल केली असे स्पष्ट करत युवा उद्योजक तथा भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आपला यंदाचा वाढदिवस हा रतन टाटा यांच्या स्मृतीला अर्पण केला आहे. त्यामुळे त्यांनी जनतेला विनंती केली आहे की कोणीही पुष्पगुच्छ किंवा हार आणू नये, वृत्तपत्र किंवा बॅनर लावत शुभेच्छा देऊ नये, तसेच केक कापून आपला वाढदिवस साजरा करू नये. लोकांच्या हिताचे उपक्रम मात्र पूर्वनियोजनाप्रमाणे होतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुढील प्रमाणे जनहिताचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
१)माडखोल
प्राथमिक आरोग्य केंद्र
ॲम्बुलन्स वितरण
सकाळी ९.३०वाजता
२) सावंतवाडी शहर
नगरपरिषद
कचराकुंडी
कीटकनाशक मशीन वितरण
सकाळी ११वाजता
३) वेंगुर्ला
नगरपरिषद
कचराकुंडी व कीटकनाशक मशीन वितरण
दुपारी १२ वाजता
४) बांदा
ग्रामपंचायत
ॲम्बुलन्स वितरण
कचरा कुंडी व कीटकनाशक मशीन वितरण
दुपारी २वाजता
५) दोडामार्ग
ॲम्बुलन्स वितरण
कीटकनाशक मशीन वितरण
सायंकाळी ४ वाजता
६) दोडामार्ग-धाटवाडी,
गोशाळा प्रकल्प उद्घाटन सोहळा
सायंकाळी ४.३० वाजता
स्वर्गीय रतन टाटा यांना अभिप्रेत जनसेवेच्या विविध कार्यक्रमातून आपण रतन टाटांच्या स्मृतीला वाढदिवसातून अभिवादन करत आहोत असे त्यांनी म्हटले आहे.