सावंतवाडी, दि.५: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत शिक्षकांसाठी आयोजित शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरशिंगे नंबर १ मधील शिक्षकांनी तिहेरी यश संपादन केले. शाळेतील पदवीधर शिक्षिका श्रीम. रिया रामनाथ सांगेलकर यांचा तालुकास्तरावर इयत्ता सहावी विषय भाषा प्रथम क्रमांक व जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक श्रीम. संगीता तानाजी सोनटक्के मुख्याध्यापिका यांचा तालुकास्तरावर इयत्ता सातवी विषय विज्ञान तृतीय क्रमांक व श्रीम. राधिका रुपेश परब उपशिक्षिका यांचा तालुकास्तरावर इयत्ता पाचवी विषय इंग्रजी द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याने सावंतवाडी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मा.श्रीमती कल्पना बोडके, सांगेली केंद्रप्रमुख मा. श्री गुंडू सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,शिक्षण तज्ञ ,स्थानिक प्राधिकरण सदस्य व सर्व सदस्य तसेच पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष व माता पालक संघ उपाध्यक्ष व सर्व सदस्य,पालक वर्ग व ग्रामस्थ यांनी हार्दिक अभिनंदन केले.