राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शिवसेना ता.रूपेश राऊळ यांनी घेतली माजी नगराध्यक्ष साळगावकर यांची सदिच्छा भेट..

0
155

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण..

सावंतवाडी,दि.२० : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज गुरुकुल येथे सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेतली.

आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
एकीकडे केसरकर आणि राणे यांची राजकीय जवळीक पाहता आता केसरकर यांना सावंतवाडी पालिका निवडणुकीमध्ये शह देण्यासाठी ही भेट घेतली असावी अशा चर्चेला उधाण आले आहे.

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या कारकिर्दीत केलेली कामे आणि त्यांचा असलेला शांत, संयमी स्वभाव पाहता सावंतवाडीतील नागरिक पुन्हा एकदा साळगावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतील का..? हे पाहणे मात्र औस्तुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here