वैभव नाईकच पुढचे पालकमंत्री होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत तेर्सेबांबर्डे येथील मनसेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

0
24

आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

कणकवली,दि.२३: आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांचा विजय निश्चित असून,वैभव नाईकच पुढचे पालकमंत्री होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तेर्सेबांबर्डे येथील मनसे पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारा भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी जिल्ह्याला आमदार वैभव नाईक यांची गरज असल्याचे प्रवेश कर्त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
मनसेचे गणपत परब, अमित पुरलकर,प्रशांत पुरलकर, अमरदीप मांजरेकर, बाळा कांडरकर, बुधाजी सडेकर, संतोषी पुरलकर, अभिमन्यू परब यांनी शिवसेना पक्षाचा झेंडा हाती घेतला. या प्रवेशासाठी तेरसेबांबर्डे गावचे शाखाप्रमुख मंगेश परब,अमित बाणे,युवासेना उपशाखाप्रमुख अक्षय मांजरेकर,अशोक बांबर्डेकर, उपशाखाप्रमुख अजित साळगांवकर तसेच इतर शिवसैनिकांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, कुडाळ शिवसेना नेते अतुल बंगे, एसटी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, ओबीसी सेल शहर प्रमुख राजू गवंडे आदींसह श्री देऊलकर, श्री. साटेलकर यांच्यासारखे जेष्ठ शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here