सावंतवाडी,दि.२८: येथील विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ‘जे’ वक्तव्य केले त्यावरून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. छत्रपतींचा पुतळा कोसळणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. किंबहुना असे घडू नये, महाराष्ट्रात यापूर्वी असे कधीच घडले नाही. अत्यंत संवेदनशील, भावनिक आणि तेवढाच जिव्हाळ्याचा विषय असलेल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या छत्रपतींच्या पुतळा कोसळल्याबद्दल एका जबाबदार मंत्र्यांनी असं विधान करणे अत्यंत चुकीचे आहे. या विधानावरून त्यांच्या बुद्धिमत्तेची कीव करावीशी वाटते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला आहे.
आज आमदार जयंत पाटील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. सावंतवाडी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अर्चना घारे – परब. महिला जिल्हाध्यक्ष अँड. रेवती राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेमकर, महिला शहराध्यक्ष अँड. सायली दुभाषी, सौ. नम्रता कुबल, सावंतवाडी तालुका विधानसभा महिला प्रमुख नितिषा नाईक, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, वेंगुर्ला महिला तालुकाध्यक्ष दीपिका राणे, सोशल मीडिया कोकण विभागीय अध्यक्ष सचिन पाटकर, वेंगुर्ला कार्याध्यक्ष सुशांत कोसुलकर, सावंतवाडी तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जहूर खान, महिला तालुकाध्यक्ष मारीत फर्नांडिस, तौसीफ आगा, मनोज वाघमोरे, युवक तालुकाध्यक्ष ऋतिक परब, सावंतवाडी विधानसभा समन्वयक राजू भगत, अर्चना फाउंडेशनच्या पूजा दळवी, जॉनी डिसोजा, वैभव परब, शेखर परब यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.