निरवडेत १५ तारखेला जिल्हास्तरीय “रस्सीखेच” स्पर्धेचे आयोजन…

0
215

राष्ट्रीय खेळाडू अर्पिता राऊळांचा सन्मान;राजन तेलींसह,अर्चना घारे,लखम राजेंची उपस्थिती…

सावंतवाडी,ता.०९: निरवडे येथील महापुरूष कला क्रीडा मंडळ माळकरवाडी यांच्या माध्यमातून १५ तारखेला माळकरवाडी येथील पटांगणावर “एक गाव एक संघ” अशा पध्दतीने जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय स्तरावर रस्सीखेच स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला खेळाडूू अर्पिता राऊळ यांचा उपस्थितांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या कोकण महिला अध्यक्षा तथा सावंतवाडी पक्षनिरिक्षक सौ. अर्चना घारे, पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, निरवडे सरपंच सौ. सुहानी गावडे, सोनुर्ली सरपंच नारायण हिराप, न्हावेली सरपंच अष्टविनायक धाऊसकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, माजी सरपंच सदा गावडे आदी उपस्थित राहणार आहे. तर स्पर्धेच्या समारोप प्रसंगी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ आदी उपस्थित राहणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोक रक्कम दहा हजार रुपये आणि चषक तर द्वितीय पारितोषिक पाच हजार आणि चषक आहे. तसेच बेस्ट फ्रंट मॅन, लास्ट मॅन यांना विशेष बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. तर इच्छुक खेळाडुुंनी आपली नावे सुनिल माळकर- ९७६५२६१६५५ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here