चौकुळ गावचा प्रश्न सुटत असेल तर कोणी अपशकुन करू नये.
सावंतवाडी,दि.१४: चौकुळ कबुलायतदार गावकर प्रश्नी चौकुळ ग्रामस्थांची बैठक मंगळवारी सातेरी मंदिरात पार पडली या बैठकीत गावप्रमुखाच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणाऱ्या शिष्टमंडळाची निवड करण्यात आली तो निर्णय पुर्ण गावचा होता अशी माहिती चौकुळ येथील माजी सैनिक संघटना अध्यक्ष बापू सोमा गावडे यांनी दिली आहे.
या बैठकीत पंधरा ऑगस्ट रोजी ठरविण्यात आलेल्या उपोषणावर चर्चा करण्यात आली,व शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पूर्ण गावाच्या संमतीने एकमुखी निर्णय घेऊन समिती निवडण्यात आली या समितीत बापू सोमा गावडे, दिनेश शिवाजी गावडे,शशिकांत गोविंद गावडे गावडे,महेश विठ्ठल गावडे,लक्ष्मण सोमा शेटवे,दिलीप भिकाजी गावडे,आनंद जिवाजी गावडे, भगवान कृष्णा गावडे,संजीव यशवंत गावडे यांना पाठविण्याचे ठरविण्यात आले हा निर्णय कोणा एकट्याचा नव्हता तर तो पूर्ण गावचा एकमुखी निर्णय होता म्हणून कोणी दिशाभूल करून प्रश्र सुटत असेल तर अपशकून करू नये असे माजी सैनिक संघटना अध्यक्ष बापू सोमा गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.