आम्ही आमच्या भवितव्यासाठी लढतोय; ही लढाई महत्वाची- माजी आमदार सदानंद चव्हाण

0
23

एकच निर्धार सदानंद चव्हाण पुन्हा एकदा आमदार..चिपळूणातील निर्धार मेळाव्यात शिवसैनिकांचा एल्गार!

चिपळूण,दि.०७: आम्ही आमच्या भवितव्यासाठी लढतोय. ही लढाई महत्त्वाची आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा भगवा, धनुष्यबाण या मतदारसंघात टिकवला पाहिजे, ही आमची भावना आहे. विधानसभा निवडणुकीत अंतिम निर्णय होईपर्यंतच्या दृष्टीने हा निर्धार मेळावा असल्याचे शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी चिपळूणमधील निर्धार मेळाव्याप्रसंगी स्पष्ट केले.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी “एकच निर्धार, सदानंद चव्हाण पुन्हा एकदा आमदार” असा एल्गार पुकारला आहे. यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये उत्साह दिसून आला. छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे साहेब, शिवसेना प्रमुख नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय असो, अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडण्यात आले.

शिवसेनेचा निर्धार मेळावा बहादूरशेखनाका येथील पुष्कर हॉलमध्ये पार पडला. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके, तालुकाप्रमुख संदेश आयरे, दिलीप चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य अभय सहस्त्रबुद्धे, सदानंद पवार, माजी नगरसेवक महम्मद फकीर, शरद शिगवण, युवासेना शहर अधिकारी विनोद पिल्ले, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ. रश्मी गोखले, तालुकाप्रमुख सुप्रिया सुर्वे, शहरप्रमुख प्राजक्ता टकले, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रज्ञा धनावडे, माजी नगरसेवक सौ. स्वाती दांडेकर, अंकुश आवले, विकी लवेकर आदी उपस्थित होते.

यावेळी सदानंद चव्हाण म्हणाले की, चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक जिंकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिलेला शब्द पूर्ण करण्यात यशस्वी झाल्याचे समाधान आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेल्या विश्वासातून शिवसैनिक पेटून उठला. तुमच्या सर्वांच्या ताकदीवर दोन्ही निवडणुका जिंकलो आहोत. मात्र, आता आपण गुहागरमधून निवडणूक लढतोय की काय? म्हणूनच आपल्या सर्वांसमोर स्पष्ट भूमिका यावी, यासाठी हा निर्धार मेळाव्याचे आपल्या सहकाऱ्यांनी नियोजन केले असल्याचे सांगितले.

चिपळूण -संगमेश्वर मतदारसंघावर भगवा फडकत रहावा

महायुतीत पक्ष वाढवण्याचा- उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. या अधिकारासाठीच हा मेळावा असून शिवसेना-भाजप युतीत आपल्याला उमेदवारी मिळेल असा विश्वास व्यक्त करतांना या मतदारसंघावर भगवा फडकत रहावा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख नेते, मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे विचार पुढे घेऊन जायचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तुमच्या मनातील आमदार निवडून येईल

शिवसेना- भाजपा युती पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त करताना आम्ही आमच्या अस्तित्वासाठी लढतोय. ही लढाई महत्त्वाची आहे. निवडणूक उमेदवारी मिळवून जिंकणे देखील महत्त्वाचे आहे. तुमच्या मनातील आमदार निवडून येईल, असा विश्वास उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांना माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी यावेळी दिला. महिला भगिनींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सहभागी व्हावे. तसेच महायुती सरकारने आणलेल्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. प्रज्ञा धनावडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. रश्मी गोखले, तालुकाप्रमुख संदेश आयरे, सदानंद पवार, माजी उपसभापती शरद शिगवण, माजी पंचायत समिती सदस्य अभय सहस्त्रबुद्धे, सीताराम कदम, माजी नगरसेवक महंमद फकीर यांनी आपल्या मनोगतात माजी आमदार सदानंद चव्हाण यांना चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली पाहिजे. शिवसेना मुख्य नेते, मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी सदानंद चव्हाण यांना आमदारकीचा शब्द दिला असल्याचे सदानंद पवार यांनी यावेळी सांगितले. तर उर्वरित पदाधिकाऱ्यांनी “एकच निर्धार सदानंद चव्हाण आमदार” असा निर्धार केला आहे. तुम्ही उमेदवारी घेऊन या. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास व्यक्त करताना सदानंद चव्हाण यांच्या आमदारकीसाठी शिवसैनिकांनी एल्गार पुकारला.

या मेळाव्याचे सूत्रसंचालन रुपेश घाग यांनी केले. तर हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. या मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here