ग्रामस्थांचे विद्युत वितरण कार्यकारी अभियंता यांना निवेदन
सावंतवाडी,दि.०१: तालुक्यातील शिरशिंगे येथील धरण क्षेत्राच्या वरच्या भागात गोठवेवाडी,परबवाडी, मळईवाडी या वाड्या येतात. या वाड्यात जाणारी (११) इलेव्हन के.वी. लाईन धरण चालू करताना तात्पुरत्या स्वरुपात घनदाट जंगल व दऱ्यांमधून देण्यात आलेली होती. परिणामी या भागात घनदाट जंगल वाढत असल्याने लाईन वेळोवेळी नादुरुस्त होते. त्यामुळे वीज ग्राहकांना बराच काळ अंधारात राहावे लागते.
अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे १५ दिवस लाईट गेल्याने येथील ग्रामस्थांना अंधारात रहावे लागले. असे दरवर्षी पावसाळ्यात होते. या तीन वाड्यात साधारणपणे १००० लोकवस्ती असून परिणामी शाळेतील मुले यांच्या अभ्यासावर सुद्धा परिणाम होतो. सद्यस्थिती लाईट बंद आहे. तरी आपण आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करुन ११ केव्ही लाईन धरण क्षत्रातील कायमस्वरुपात काढण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यावरुन घेण्यात यावी.
यासाठी ग्रामस्थ लागणारे सर्व सहकार्य करण्यास तयार आहेत.
अशा प्रकारचे निवेदन येथील ग्रामस्थांकडून कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे.
अन्यथा १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता सावंतवाडी येथील वीज वितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा शिरशिंगे ग्रामस्थांकडून निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी माजी सरपंच सुरेश शिर्के, शिवसेना शिंदे गट उपतालुकाप्रमुख जीवन लाड, श्री सुर्वे, बाबू सुर्वे,श्री शिर्के श्री घावरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.