प्रत्येक मराठा समाज बांधवाने १ ऑगस्ट रोजी एक झाड लावावे
सावंतवाडी,दि.३०: आपले पाटील नेतृत्व नेक, प्रत्येकाने झाडं लावावे एक !मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा दि.१ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यभरात वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक मराठा समाज बांधवांनी आपल्या घरासमोर, आपल्या परिसरात, गावात, सार्वजनिक ठिकाणी स्वतः शेतात एक झाड लावून साजरा करायचा आहे तरी सकल मराठा समाजाच्या प्रत्येक बांधवाने या अभियानात सहभागी होऊन जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाला एक झाड लावावे असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.
त्या लावलेल्या झाडाचे संगोपन ही करून जोपासायचे आहे. यातून राज्य भरात कोट्यवधी मराठा बांधवांनी एक झाड लावून जगात वृक्षारोपण करण्याचा विक्रम करायचा आहे.राजकीय कवच कुंडले बाजुला ठेवून प्रत्येक मराठा बांधवाने यामध्ये सहभागी होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत करावी असे आवाहन सीताराम गावडे यांनी केले आहे.