सावंतवाडी बस स्थानक परिसरात शिवसेनेच्या वतीने बुजविण्यात आले खड्डे..
सावंतवाडी,दि.२७: तालुक्यात आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
सावंतवाडी बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांना चालताना त्रास व्हायचा मात्र कित्येक वेळा प्रशासनाला कळूनही याकडे दुर्लक्ष केल्याने आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी बस स्थानक परिसरात जेसीबीच्या सहायाने खड्डे बुजवले,आणि सरकार विरोधात घोषणा दिल्या
.
यावेळी शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ , तालुका संघटक मायकल डिसोजा, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी,चंद्रकांत कासार,बाळा गावडे, शब्बीर मणियार,मेघशाम काजरेकर, पुरुषोत्तम राऊत आदी शिवसेना महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.