गुणवंत विद्यार्थी, मान्यवरांचाही होणार सन्मान.
सावंतवाडी,दि.२६ : शहरातील कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचा समारोप कार्यक्रम रविवार दिनांक २८ जुलै २०२४ रोजी सकाळी ८ वाजता होणार संपन्न होणार आहे. हा दिवस समुदाय सहभाग दिवस असून या अंतर्गत ‘शाळा व समाज – आदर्श नातेसंबंध’ या विषयावर सुप्रसिद्ध शैक्षणिक, सामाजिक प्रबोधनकार तथा व्याख्याते प्रा. रूपेश पाटील यांचे व्याख्यान होणार आहे.
तसेच या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, पालक-शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक संघ, माजी विद्यार्थी, माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक, माजी सैनिक, वैद्यकीय अधिकारी तसेच बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे यांनी केले आहे.