भाजपा पक्षा मार्फत विशाल परब यांच्या माध्यमातून माडखोल येथे मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

0
38

सावंतवाडी,दि.२६: तालुक्यातील माडखोल येथे आज भाजपा तर्फे खासदार नारायण राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून व भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या सहकार्याने माडखोल,धवडकी शाळेत सर्व विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी माडखोल उपसरपंच कृष्णा (जीजी ) राऊळ, संजय राऊळ ( माजी सरपंच ) ,सुरेश आडेलकर ( माजी उपसरपंच ) ,विजय राऊळ, ( शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष – माडखोल नं १ ) , शैलेश माडखोलकर ,संतोष तेली,अमित राऊळ, उदय राऊत ( अध्यक्ष – शा . व्य. स . ),जगदिश नाईक,तुळशीदास मुरकर ( माजी अध्यक्ष – शा . व्य. स . ) शिक्षकवर्ग उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी भाजपा पक्ष तसेच खासदार नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण व विशाल परब यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here