विभव राऊळ शिष्यवृत्ती परीक्षेत इंग्रजी माध्यमामध्ये जिल्ह्यात प्रथम

0
176

सावंतवाडी दि.०५:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती ( पाचवी ) परीक्षेत मदर क्वीन इंग्लिश स्कूल सावंतवाडीचा विद्यार्थी विभव विरेश राऊळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रथम आला आहे. त्याला ८५.२३ टक्के गुण मिळाले असून, तो शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातवा व सावंतवाडी तालुक्यात दुसरा आला आहे. त्याला त्याचे वडील वकील विरेश राऊळ, आई सरकारी वकील वेदिका राऊळ तसेच मुख्याध्यापिका साळगावकर मॅडम, वर्ग शिक्षिका नार्वेकर मॅडम,सना मॅडम,भोसले मॅडम, चव्हाण सर तसेच शाळेतील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. विभव राऊळचे संस्था अध्यक्ष राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज लखंमराजे भोसले यांनी अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे. विभव हा बुद्धिबळ खेळातील राष्ट्रीय खेळाडू असून, त्याने वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धामध्येही यश मिळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here