प्रशालेच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा
देवगड,दि.१९ : देवगड तालुकास्तरीय बाल विज्ञान मेळाव्यामध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर, तळेबाजार या प्रशालेने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. यानिमित्ताने प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यात सहभागी होऊन यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून विज्ञान शिक्षक सुशील कृष्णा जोईल यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ तळेबाजारचे अध्यक्ष संदीपशेठ तेली, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, खजिनदार संतोष वरेरकर, सचिव कृष्णा साटम, सदस्य बाळकृष्ण पारकर, विश्वास सावंत, संजय जाधव,यांसह सर्व पदाधिकारी, शालेय समिती, माता-पालक संघ, राज्य शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते मुख्याध्यापक नंदन घोगळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव व हार्दिक अभिनंदन होत आहे.