बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले अभिनंदन..

0
39

सावंतवाडी, दि.२२: राज्यात परत एकदा कोकण पॅटर्न म्हणून कोकण विभागातले सगळे विद्यार्थी व विद्यार्थिनी एक नंबरवर आल्याबद्दल मी मनापासून त्यांचे विशेष अभिनंदन करतो. अशाच पद्धतीने कोकणचा मान आमच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वाढवत राहावा, अशा शुभेच्छा भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिल्या.दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा मंगळवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर केला. बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे विशाल परब यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here