सावंतवाडी,दि.२०: शहरात दुपारी साडेबाराच्या सुमारास माठेवाडा सावंतवाडी येथील डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या डॉ परूळेकर नर्सिंग होम समोरील रस्त्यावरून दोन मोठे गवे हाॅस्पिटलच्या पायऱ्या चढून आक्रमक रित्या हाॅस्पिटल समोर आले आणि हाॅस्पिटलच्या डावीकडील भागात धावत पुढे गेले.पुढील वाट बंद असल्याने शेजारच्या शिर्के यांच्या अंगणात त्यांनी लावलेले पत्रे उडी मारून फाडून मागच्या बाजूला असलेल्या जंगल वजा भागात नाहीसे झाले.
अशा रितीने सावंतवाडी शहरात डांबरी रस्त्यावरून येऊन उंचावर असलेल्या हाॅस्पिटलमध्ये आक्रमक रित्या गवारेडे येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नेहमी हाॅस्पिटलच्या समोर अनेक पेशंट आणि त्यांचे नातेवाईक रुग्ण तपासणीच्या प्रतिक्षेत उभै असतात, आज सगळेजणं वेटींग रुममध्ये बसलेले होते म्हणून मनुष्यहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
डॉ जयेंद्र परुळेकर यांनी याबाबत जिल्हा वनसंरक्षक (DCF) यांना झालेला प्रकारची माहिती दूरध्वनी द्वारा कळवली आहे.
यानंतर वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला असल्याची माहिती श्री परुळेकरांनी दिली.