सावंतवाडीत महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ

0
49

चराठ्याचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी तसेच श्री देव पाटेकर व श्री देव उपरलकरचा घेतला आशिर्वाद

सावंतवाडी,दि.२३: चराठ्याचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी, सावंतवाडीचे श्रद्धास्थान श्री देव पाटेकर व श्री देव उपरलकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा शिवसेनेचे स्थानिक आमदार दीपक केसरकर, भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सुरेश गवस, मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बबन राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो, माजी नगरसेवक राजू बेग, मनोज नाईक, ॲड. परिमल नाईक, सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, भाजपचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, शिवसेनेचे शहरप्रमुख बाबू कुडतरकर, आनंद नेवगी, दीपाली भालेकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, उत्कर्षा सासोलकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उदय भोसले, गुणाजी गावडे, सुधीर राऊळ, देव्या सुर्याजी, माजी नगरसेवक गुरुदास मठकर, संतोष गांवस, बंटी पुरोहित, बाळू वाळके, केतन आजगांवकर, प्रशांत विरनोडकर, संदेश सोनुर्लेकर,सुकन्या टोपले, साक्षी गवस, मिसबा शेख, मेघना साळगांवकर, अमित परब, सत्यजित धारणकर, अर्चित पोकळे, विराग मडकईकर, ओमकार पावसकर, तेजस माने, अजय सावंत, दिलीप भालेकर, राघू चितारी, संजय वरेरकर, मंगलदास चोडणकर, समीर पालव आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here