सावंतवाडी,दि.१६: तालुक्यातील नेमळे गांवकर कुंभारवाडी येथील श्री देव ब्राह्मण मंदिरात दरवर्षी प्रमाणे बुधवार दि १७ एप्रिल रोजी रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम ११वा कीर्तन दुपारी १२ वा रामजन्म सोहळा महाप्रसाद, सायं ६ वा पासून भजनाचा कार्यक्रम तसेच गुरुवार १८ एप्रिल रोजी रात्रौ ठीक ११ वा श्री देव ब्राम्हण मंदिरात खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन लाभ श्री देव ब्राह्मण कला क्रीडा मित्र मंडळ गावकर कुंभारवाडी व नेमळे ग्रामस्थ मानकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.