सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही..
सावंतवाडी,दि.१५: येथील माजगाव येथे चालत्या दुचाकीवर विजेचा खांब कोसळल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. यात कालेली येथील युवक दत्तात्रय परब सुदैवानं बचावला. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात त्याला अधिक उपचारासाठी दाखल केले असता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी त्याची भेट घेत विचारपूस केली.
माजगाव येथे जुन्या मुंबई-गोवा
महामार्गावर ही घटना घडली. यावेळी येथून प्रवास करणारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रसाद परब यांनी बचावकार्यात सहभागी होत जखमी युवकाला मदत केली. उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जखमी दत्तात्रय परब यांची भेट घेत अर्चना घारे-परब यांनी विचारपूस केली. अशा घटना वारंवार घडत आहेत. महावितरणला याबाबत विचारणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्ष अँड.सायली दुभाषी, युवती अध्यक्षा सावली पाटकर, तालुका उपाध्यक्ष बाबल्या दुभाषी, शहर उपाध्यक्ष राकेश नेवगी, विद्यार्थी सेल तालुकाध्यक्ष ऋतिक परब, प्रसाद परब, सुधा परब आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते