आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन च्या निवेदनाचा इफेक्ट…
सावंतवाडी,दि.१४ : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग च्या वतीने काही दिवसापूर्वी वाहनांवरील ब्लॅक फिल्म च्या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते.या निवेदनाची दखल घेत काल शनिवारी सावंतवाडी येथे जिल्हा वाहतूक पोलीस पथकाची टीम दाखल होत ब्लॅक फिल्मच्या काचा असलेल्या ३२ चार चाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.
यावेळी या कारवाई दरम्यान ए.एस.आय रवी झटकर, ए एस आय.दाजू पवार, पोलीस हवालदार महेंद्र बांदेकर ,जानू बोडेकर,श्री.मुंडे,महिला पोलीस नाईक सौ.वागतकर आदी उपस्थित होते.