चिपळूण,दि.१०: (ओंकार रेळेकर) सतीश वाघ फाउंडेशन च्या वतीने सुप्रिया लाइफ सायन्स लिमिटेड कंपनीचे सर्वेसर्वा सतीश वाघ यांनी बोरिवलीच्या नॅशनल पार्कला १७ सीटर वातानुकूलित बस सीएसआर अंतर्गत भेट दिली असून या बसचा अर्पण सोहळा नुकताच पार पडला. नॅशनल पार्क मध्ये येणाऱ्या पर्यटकांना टायगर
सफारी घडवण्यासाठी सतीश वाघ फाउंडेशनने ही बस सीएसआर मधून दिली
आहे.
सुप्रिया लाइफ सायन्स लिमिटेड या कंपनीच्याफोटो : नॅशनल पार्क च्या अधिकाऱ्यांच्या हातात गाडीची चावी सुपूर्द करताना उद्योजक डॉ.सतीश वाघ छायाचित्रात दिसत आहे(छाया : ओंकार रेळेकर) माध्यमातून
व्यवस्थापकीय संचालक श्री सतीश वाघ हे कायमच सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात.
याच माध्यमातून सुमारे ३५ लाख किमतीची १७ सीटर वातानुकूलित बस
बोरिवलीच्या नॅशनल पार्कला भेट म्हणून दिली आहे. नॅशनल पार्क मध्ये येणारे
पर्यटक या बसमधून या पार्कचे सफर करते करतील त्यासाठी त्यांना नॅशनल पार्कच्या नियमानुसार योग्य ते तिकीट द्यावे लागेल मात्र वातानुकूलित या बसमुळे पर्यटकांची सफर आनंददायी होईल हे नक्की. विशेष बाब म्हणजे ही बस नॅशनल पार्कच्या व्यवस्थापनास सुपूर्द केल्यानंतर व्यवस्थापनासह स्वतः सतीश वाघ या बसमधून नॅशनल पार्कमध्ये फेरफटका मारत असताना खुद्द खरोखरच्या वाघाने बसच्या आडवे येऊन सी एस आर ऍक्टिव्हिटीतील वाघ म्हणजेच सतीश वाघ यांचे स्वागत केलेले एका व्हिडिओ मध्ये पाहायला मिळाले आहे.