सावंतवाडी,दि.१०: डेगवे स्थापेश्वर मंदिर येथे पाडव्यानिमित्त दरवर्षी दिपोत्सव साजरा करण्यात येतो.
यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावर्षी पाडव्या निमित भाजपा युवामोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी सहकुटुंब हजेरी लावून श्री देव स्थापेश्वर देवतेचा आशीर्वाद घेतला व कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
यावेळी विशाल परब,सौ. वेदिका परब, देवस्थानचे भगवान देसाई, प्रविण देसाई, मधू देसाई आदी डेगवे गावातील सुमारे १२०० ग्रामस्थ उपस्थित होते.