क्षेत्रीय पेालिस अधिकारी व सर्व क्षेत्रीय अधिकारी यांची बैठक संपन्न

0
57

निवडणूक प्रक्रियेत क्षेत्रीय अधिकाऱ्यांची भूमिका महतत्वपूर्ण..जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरी दि.०८: निवडणूक प्रक्रियेत क्षेत्रीय अधिकारी यांची भूमिका महत्त्वाची आहे. क्षेत्रीय अधिकारी यांनी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यामधील दुवा म्हणून काम करावे असे जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी सांगितले. कुडाळ येथे क्षेत्रीय पेालिस अधिकारी व सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच २६९ कुडाळ विधानसभा मतदारसंघामधील सर्व अधिकाऱ्यांची आज मराठा समाज हॉल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी श्री तावडे यांनी उपस्थितांना मतदान प्रक्रियेबाबत विस्तारित व सविस्तर मार्गदर्शन केले. या बैठकीला सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री, अतिरिक्त पेालिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय अधिकारी कुडाळ तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, कुडाळचे तहसिलदार श्री वसावे आणि मालवणच्या तहसिलदार वर्षा झाल्टे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. श्री तावडे म्हणाले, निवडणूक कामकाज करत असताना सर्वांनी सतर्क राहून आपापली जबाबदारी पार पाडायची आहे. क्षेत्रीय अधिकारी यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांना समक्ष भेटी देऊन सर्व सुविधा सुस्थितीत असल्याबाबतची पुन्हा एकदा खात्री करुन घ्यायची आहे. सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना वाहन व्यवस्था पुरवण्यात आलेली आहे त्याच वाहन व्यवस्थेतून निवडणूक विषयक कामकाज पाडावयाचे आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेकडील प्राप्त वेळापत्रकानुसार गृहभेटी द्वारे टपाली मतदान प्रक्रिया पार पाडावी तसेच गृह भेटीद्वारे होणाऱ्या मतदान प्रक्रिये बाबत गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सतर्क राहून कामकाज करण्याचे आवाहनही श्री तावडे यांनी केले.

यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी देखील पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here