सावंतवाडी,दि.०८: मुस्लिम बांधवांचा महत्वाचा सण रमजान ईद या निमित्त आज युवा उद्योजक विशाल परब यांनी शुभेच्छा देत त्यांना खिरकुरम्याचे साहित्य वाटप केले.
मुस्लिम बांधवांच्या सुख दुःखात यापुढे नेहमी आम्ही सोबत राहू असा शब्दही श्री परब यांनी दिला.
यावेळी दिलीप भालेकर,अमित परब,केतन आजगावकर,माजी नगरसेवक राजू बेग आदी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.