सावंतवाडी,दि.०२: येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेच्या इयत्ता- पहिली ते चौथीच्या एकूण १७ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीमध्ये यश मिळवित गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले. जिल्ह्यातील कळसुलकर शाळा ही विद्यार्थ्यांना ज्ञान, कला, क्रीडा या क्षेत्रात उज्वल यश संपादन करण्यासाठी विशेष मेहनत घेत असते.स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मुलांच्या अंगी बौद्धिक क्षमता रुजवण्याचे महत्त्वाचे काम अशा परीक्षांच्या माध्यमातून ही शाळा घेत असते.
त्याप्रमाणे या परीक्षेमध्ये ही मुलांनी राज्यस्तरीय यश संपादन केलेले आहे.
यामध्ये इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी निधी यशवंत गवस हिने राज्यामध्ये पाचवी येण्याचा बहुमान मिळवत राज्यस्तरीय बक्षीस संपादन केले आहे. तसेच युगराज सावरवाडकर, हिमानी कोलगावकर, प्रत्युष जाधव, ध्रुव नाडकर्णी, प्रसंगीत बिले, लावण्या राऊळ, चैतन्य सावंत, सार्थक वरक, कृष्णा पायशेट, चैत्राली काळे, धारा कोरगावकर, निधी गवस, गार्गी पई, आरुष नाईक, श्रीधर शुक्ल आदी विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा तथा राज्य गुणवत्ता यादीमध्ये यश संपादन केले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष शैलेश पई, सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर इतर पदाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत सर्व शिक्षक, पालक- शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ पदाधिकारी व इतर पालक यांनी विशेष कौतुक केले. या सर्व विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शक श्री प्रदीप सावंत, श्री डी जी वरक, श्री अमित कांबळे, श्रीमती ज्योत्स्ना गुंजाळ, श्रीमती प्राची बिले, श्रीमती स्वरा राऊळ, श्रीमती संजना आडेलकर, श्रीमती स्मिता घाडीगावकर या शिक्षकांचेही कौतुक करण्यात आले.