सावंतवाडी,दि. २७: तालुक्यातील आंबोलीच्या पायथ्याशी वसलेल्या दाणोली येथील श्री सद्गुरू साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी उत्सव आज मोठ्या उत्साहात व भक्तांच्या अलोट गर्दीत पार पडला.
या पुण्यतिथीचे औचित्य साधून रत्नागिरी सिंधुदुर्ग चे लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांनी साटम महाराजांचे दर्शन घेतले.व आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी साटम महाराज चरणी साकडे घातले.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले,गितेश राऊत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार,मायकल डिसोजा,अशोक परब, दत्ताराम जाधव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सुखी मॅडम, उपसरपंच स्वप्निल परब, दीनानाथ कशाळकर, ॲड.शामराव सावंत कार्यकर्ते व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.