…अखेर शेतकऱ्यांच्या मागणीला यश
सावंतवाडी,दि.२१: तालुक्यातील शिरशिंगे गावात अखेर स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात आले आहे.
येथील भौगोलिक परिस्थितीचा विचार केला असता शिरशिंगे पंचक्रोशीतील गाव आणि तालुक्यातील इतर ठिकाणावरील भौगोलिक परिस्थिती वेगळी असल्याने येथील शेतकऱ्यांना त्याच निकषावर नुकसान भरपाई दिली जात होती, मात्र आता स्वयंचलित हवामान केंद्र बसविल्याने येथील भौगोलिक परिस्थितीच्या आधारावर नुकसान भरपाई मिळणार असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
दरम्यान मागील दोन वर्षांपासून विमा धारक शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले ते भविष्यात आता होणार नाही.
सदरचे हवामान केंद्र बसविण्यासाठी माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी नगराध्यक्ष संजू परब,जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर,माजी.जि.प स.पंढरीनाथ राऊळ,शिरशिंगे गावचे सरपंच दीपक राऊळ, ग्रामसेवक स्वप्नील तारी,माजी उपसरपंच पांडुरंग राऊळ, प्रशांत देसाई,संदीप राऊळ आदी ग्रामपंचायत सदस्यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
यासाठी तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन व कृषी सहायक अक्षय खराडे यांचे सहकार्य लाभले.