सावंतवाडी,दि.१५: तालुक्यातील शिरशिंगे गावात शिवसेनेच्या माध्यमातून विविध विकास कामांची आज जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते भूमिपूजने करण्यात आली.
मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून व शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख जीवन लाड यांच्या पाठपुराव्यातून ही विकास कामे मंजूर करण्यात आली होती.
यावेळी तालुकाप्रमुख नारायण राणे, उपतालुकाप्रमुख जीवन लाड,गजानन नाटेकर, शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ,विभाग प्रमुख विनायक सावंत, संघटक पंढरी राऊळ ,उपविभाग प्रमुख संजय पालकर, माजी सरपंच नारायण राऊळ ,ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत राऊळ, सामाजिक कार्यकर्ते गणपत राणे, माजी सरपंच पांडुरंग राऊळ, गावकर विठ्ठल राऊळ, पोलीस पाटील गणू राऊळ,भिवा धोंड,अरुण राऊळ,विनोद राऊळ,तुकाराम धोंड, विष्णू राऊळ, न्हानु राऊळ, रवी घावरे, उत्तम शिर्के, वसंत घावरे, सुनील राऊळ ,सुरेश राऊत प्रशांत देसाई, राजेंद्र सावरवाडकर, आदी शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.