कोल्हापूर नियोजन समितीवर सिंधुदुर्गचा सुपूत्र कोनशी येथील अमित कामत यांची वर्णी

0
193

सावंतवाडी दि.२५ : मूळ सावंतवाडी तालुक्यातील कोनशी येथील मात्र कोल्हापूर येथे स्थायिक असलेले वास्तुविशारद अमित कामत यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या नियोजन समितीवर निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असून तेथील कामाचे समन्वयक म्हणून कामत यांच्याकडे जबाबदारी असून त्याची निवड नियोजन समितीवर करण्यात आली आहे.
अमित कामत हे मूळचे सावंतवाडी तालुक्यातील कोनशी येथील आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले गार्डन बॅ नाथ पै हाॅल देवगड पवनचक्की गार्डन तसेच सावंतवाडी येथील अनेक पर्यटन कामाची वास्तुविशारद म्हणून काम केले आहे.तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक कामाचे आराखडे ही त्यांनी बनवले आहेत.ते सध्या कोल्हापूर येथे राहत आहेत.
तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे कोल्हापूर सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री असून त्याच्या कोल्हापूर येथील कामाचे समन्वयक म्हणून कामत हे काम पाहात असून त्यांना कोल्हापूर येथील जिल्हा नियोजन समितीवर स्थान देण्यात आले आहे.कोल्हापूर जिल्ह्य़ातील दिग्गज नेत्याचा या नियोजन समिती त समावेश असून त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुपूत्राला स्थान देण्यात आल्याने सर्वथरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here