शिरशिंगे येथे डंपर पलटी होऊन अपघात…

0
90

सावंतवाडी,दि.२२: तालुक्यातील शिरशिंगे धोंडवाडी आणि परबवाडी दरम्यान असलेल्या वळणावर हॉट मिक्सिंग घेऊन जाणारा डंपर पलटी झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतेही जीवितहानी झाली नाही. मात्र ड्रायव्हर सोबत असलेली एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे.
हा अपघात आज सकाळी ११ च्या सुमारास झाला.
अशी माहिती शिरशिंगे माजी उपसरपंच पांडुरंग राऊळ यांनी दिली.
दरम्यान घटनास्थळी उपसरपंच सचिन धोंड, सामाजिक कार्यकर्ते जीवन लाड यांनी भेट देत मदत कार्य केले.
यापूर्वी या वळणावर चार अपघात झालेले असून वाहने दरीत कोसळली होती. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे.

याबाबत कित्येक वेळा प्रशासनाला कळवून या ठिकाणी रिटेलिंग ऑल बसविण्याची मागणी केली होती.
मात्र अद्यापही त्या ठिकाणी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे या वळणावर वारंवार अपघात होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here