प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे व अधीक्षक श्री अग्रवाल यांना ह्युमन राईट च्या वतीने निवेदन…
सिंधुदुर्ग,दि.२३: सुप्रीम कोर्टाने टिटेंड ग्लास बाबत सन २०१२ रोजी दिलेल्या व्हेईकल
ॲक्टच्या नियमानुसार सर्व खाजगी वाहनांच्या काचा ट्रान्सपरंट (पारदर्शक) असाव्यात. अशा प्रकारचे निर्देश देऊन सुद्धा माञ गाड्यांच्या काचा सर्रास बऱ्याच प्रमाणात काळ्या फिल्म लावून डार्क केल्या जातात.याबाबत नियमांची अंमलबजावणी होताना आढळत नाही.
यामुळे अनैतिक धंदे, गुन्हेगारांना फिरणे, दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात इत्यादी व्यवहार बेकायदेशीर होताना दिसत आहेत. नियमांची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
जे वाहनधारक नियमाचे उल्लंघन करतील त्या सर्व संबंधित वाहन धारकांवर तात्काळ कारवाई करा असे निवेदन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग च्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे व जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना देण्यात आले .
यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर,उपाध्यक्ष मिलिंद धुरी,सचिव विष्णू चव्हाण, सहसचिव ॲड. मोहन पाटणेकर,कुडाळ तालुका अध्यक्ष आर.के.सावंत, उपाध्यक्ष सुर्यकांत धुरी,सोशल मीडिया प्रमुख आनंद कांडरकर,जिल्हा सदस्य नामदेव जानकर,बाळा कोरगांवकर आदी उपस्थित होते.