राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची बांधकाम विभागाकडे मागणी
सावंतवाडी दि.२३ : मळगाव घाट येथील गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेले चर तात्काळ बुजवण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी बांधकाम अभियंता अनामिका चव्हाण यांच्याकडे केली आहे. दरम्यान खोदण्यात आलेले चर तात्काळ बुजवण्यात येतील, असे आश्वासन सौ.चव्हाण यांनी दिले.

याबाबतचे अधिक माहिती अशी की गॅस पाईपलाईन काम बंद करण्यात आले होते. परंतु खोदण्यात आलेल्या चर हे बुजवले गेले नसल्याने व तेथे कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक अथवा बॅरिगेट्स नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हे चर तात्काळ बुजवण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचे नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी आज सौ.चव्हाण यांची भेट घेतली.
यावेळी शहराध्यक्ष देवा टेंमकर, हिदायतुल्ला खान, आशिष कदम ,संतोष जोईल,आदी उपस्थित होते.



