विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या ११ वाहन चालकांवर कारवाई..

0
97

सिंधुदुर्ग,दि.०५: जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान २०२४ अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत आज दिनांक ०५ फेब्रुवारी रोजी विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यात आली.
एन.एच ६६ हायवे कणकवली, कुडाळ व झाराप येथेही तपासणी करण्यात आली यावेळी एकूण ११ वाहनचालकांची तपासणी केली व ऑनलाइन चलन देण्यात आले .

यामध्ये डेंजरस ,ड्रायव्हिंग ,लेन डिसिप्लिन ,पीयूसी इन्शुरन्स, इत्यादी ऑनलाइन चलन देण्यात आले , तसेच डेंजरस ड्रायव्हिंग व लेन डिसिप्लिन्, हेल्मट व सीटबेल्ट वापरणे ,वाहन चालवताना घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अरुण पाटील, सिद्धार्थ ओवाळ व एसटी महसूल विभागाचे अधिकारी संदीप चव्हाण, वाहन चालक राणे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here