ओटवणे ध्रुव चषक अणावच्या दशावतार योद्धाकडे..तर पेडणे गोव्याचा साई यश बाराजाण उपविजेता

0
61

सावंतवाडी,दि.०५: ओटवणे चौगुले मित्रमंडळ आणि गावठणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य खुल्या ध्रुव चषक २०२४ क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम अटीतटीच्या रोमहर्षक सामन्यात अणावच्या दशावतार योद्धाने पेडणे गोव्याच्या साई यश बाराजाण संघावर मात करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले तर या स्पर्धेत साई यश बाराजाण संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेच्या अंतीम सामन्यात साई यश बाराजाण संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. मात्र दशावतार योद्धा संघाच्या भेदक गोलंदाजी व क्षेत्ररक्षणामुळे साई यश बाराजाण संघ ५ षटकात ७ गडी गमावून ४३ धावा करु शकला. त्यांनतर पाच षटकात ४४ धावांचे आव्हान स्विकारून दशावतार योद्धा मैदानात उतरला. पण साई यश बाराजाणच्या भेदक गोलंदाजीमुळे अंतिम चेंडूपर्यंत हा सामना रंगला. त्यानंतर अखेरच्या चेंडूत षटकार मारून दशावतार योद्धा विजेता ठरला. या अंतिम सामन्यातील ध्रुव पॉवर प्लेची दोन्ही षटके लक्षवेधी ठरली
तत्पूर्वी सकाळी पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात पेडणे – गोव्याचा विरुध्द साई यश बाराजाण संघाने दोडामार्गच्या हेम हिरा संघाला तर दुसऱ्या सामन्यात तळवडेच्या राजाराम वॉरियर्सने कारिवडेच्या बॅड बॉईजला नमवून या दोन्ही संघानी स्पर्धेचा पहिल्या सेमी फायनल मध्ये प्रवेश केला. त्यानंतर ओटवणेच्या साई इलेव्हनने ओटवणेच्याच ओम श्रेयस स्पोर्ट्सला तर दुसऱ्या सामन्यात अणावच्या दशावतार योद्धाने कोलगावच्या फ्रेंड सर्कलचा पराभव करीत या दोन्ही संघानी स्पर्धेच्या दुसऱ्या सेमी फायनल मध्ये प्रवेश केला.
स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये पेडणे – गोव्याच्या साई यश बाराजाण संघाने फलंदाजी पाठोपाठ उत्कृष्ठ गोलंदाजी व क्षेत्ररक्षण करून तळवडेच्या राजाराम वॉरियर्सला पराभवाचा धक्का देत स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये अणावच्या दशावतार योद्धाने घणाघाती फलंदाजीसह भेदक गोलंदाजी करत ओटवणेच्या साई इलेव्हनवर मात करीत स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. त्यामुळे या स्पर्धेत राजाराम वॉरियर्स आणि साई इलेव्हनला अनुक्रमे तृतीय व चतुर्थ स्थानावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाराम वर्णेकर, माजगाव शिवसेना विभाग प्रमुख उमेश गावकर, युवा कार्यकर्ते बबलू गावकर, सामजिक कार्यकर्ते बाळा गावकर, मुंबई मंडळाचे समन्वयक दशरथ गावकर, अरुण खरवत, शंकर वर्णेकर, तर दशावतार योद्धाचे मालक संतोष बागवे, साई इलेव्हनचे जयवंत वारंग, किशोर गोसावी, महेश गावकर, माजगावचे संतोष सावंत, रमेश गावकर, स्वरा गावकर, श्रुती गावकर, महिमा गावकर, वर्षा गावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी स्पर्धेतील विजेत्या दशावतार योद्धा संघाला ५००२४ रुपये आणि आकर्षक भव्य चषक, तर उपविजेत्या साई यश बाराजाण संघाला २५०१२४ रुपये व आकर्षक भव्य चषक, तर तृतीय व चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी ५ हजार रूपये व आकर्षक चषक अनुक्रमे राजाराम वॉरियर्स आणि साई इलेव्हनला या संघाना तसेच स्पर्धेतील मालिकावीर व उत्कृष्ट फलंदाज विशाल लुडबे (दशावतार योद्धा), गोलंदाज प्रविण सावंत (यश बाराजाण ) यांना उपस्थित मान्यवरांच्याहस्ते आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

ओटवणे येथील कु ध्रुव बबलू गावकर याच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या तीन दिवसांच्या रणसंग्राम गोवा आणि महाराष्ट्रातील आयकॉन खेळाडूंच्या क्रिकेटचा थरार क्रिकेट शौकीनांना पहायला मिळाला. ओटवणे सारख्या ग्रामीण भागातील या स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनासह क्रिकेट रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेत नामवंत खेळाडूंचा समावेश होता. त्यामुळे या स्पर्धेत चौकार व षटकारांची आतषबाजीने क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या स्पर्धेतील एकूण ३२ सामन्यांपैकी अपवाद वगळता स्पर्धेतील सर्वच सामने अटीतटीचे झाल्याने क्रिकेट रसिकांचे मनोरंजन झाले. ओटवणे सारख्या ग्रामीण गावातील क्रिकेटचा हा संग्राम युट्यूबवर लाईव्ह दाखविण्यात आला होता. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेत कॉमेंट्रीचे बादशाह जय भोसले, गुरू चिटणीस, दशरथ श्रृंगारे, लुमा जाधव, महेश चव्हाण आदींनी मालवणी, हिंदी व मराठीत समालोचन करीत क्रिकेट रसिकांची मने जिंकली. तर गुणलेखक अमोल केसरकर सोबत महेश डोंगरे, संजय हळदणकर यांनी सर्वोत्कृष्ट पंचगिरी केली. तर ऑन ट्रेंड लाईव्ह चॅनलचे मनोज पारकर गौरेश शिरोडकर साई पारकर मनीष पारकर यांनी युट्युब साठी प्रक्षेपण केले. या सर्वांचा सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here