शिरशिंगे ग्रामपंचायत वास्तु स्थापनेस ६५ वर्षे पूर्तीनिमित्त उद्या २६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम..

0
56

सावंतवाडी,दि.२५ : तालुक्यातील शिरशिंगे ग्रामपंचायत या वास्तूच्या स्थापनेस ६५ वर्षे पूर्ण होत आली आहेत. यानिमित्त येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे उद्या २६ जानेवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सकाळी ८.३० वाजता मा.ऑ. कॅप्टन बापू शिवराम राऊळ यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण, नऊ ते दहा दरम्यान ग्रामसभा, दहा वाजता सत्यनारायण महापूजा व आरती, दुपारी एक ते तीन दरम्यान तीर्थप्रसाद व महाप्रसाद, दुपारी तीन ते सायंकाळी पाच पर्यंत महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ,सायंकाळी पाच ते सात दरम्यान गावातील ग्रामस्थ व वारकरी मंडळाचे भजन, रात्री सात ते नऊ दरम्यान शाळेतील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस वितरण व सत्कार समारंभ, व रात्र ठीक नऊ वाजता बाळकृष्ण गोरे पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ कवठी यांचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे तरी या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा गावातील ग्रामस्थ व रसिक वर्गाने लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत शिरशिंगे सरपंच दिपक राऊळ,उपसरपंच सचिन धोंड,ग्रामपंचायत सदस्य,गावचे प्रमुख जाणते गावकरी ग्रामस्थ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here