सिंधुदुर्ग,दि.२१: उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यामार्फत राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत शनिवार २० जानेवारी रोजी NH – 66 मुंबई गोवा महामार्गावर हेल्मेट वापरणाऱ्या चालकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत वाहचालकांना प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मोटार वाहन निरीक्षक सचिन पोलादे, अरुण पाटील, सहा.मोटार वाहन निरीक्षक केतन पाटील,श्री सावंत, वाहन चालक श्री राणे उपस्थित होते.
दरम्यान ज्या वाहन चालकांनी हेल्मेट घातले नाहीत त्यांना ऑनलाईन चलन देण्यात आले.