शिक्षक डॉ.चंद्रकांत सावंत यांचा ओवळीये वासियांच्या वतीने सन्मान

0
57

दोन दशकातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्याची दखल

सावंतवाडी,दि.२०: तालुक्यातील ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा नाणोस शाळा नं. १ चे पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत तुकाराम सावंत यांनी गेल्या दोन दशकात समाज हितासाठी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांचा ओवळीयेवासिय, देवस्थान मानकरी आणि ओवळीये विकास मंडळ (मुंबई) यांच्यावतीने प्रेरणा गौरव पुरस्कार आणि सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
श्री देव गांगोबा जत्रोत्सवाचे औचित्य साधुन श्री देव गांगोबा मंदिरात महादेव सावंत आणि जगन्नाथ सावंत यांच्याहस्ते डॉ चंद्रकांत सावंत यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ओवळीये विकास मंडळ (मुंबई) चे सर्व पदाधिकारी, माजी सैनिक तथा अध्यक्ष श्री देव गांगोबा मंदिर जिर्णोद्धार कमिटी अध्यक्ष चंद्रकांत सावंत, महेश सावंत, मोहन सावंत, सदानंद सावंत, महादेव देसाई, बाळकृष्ण देसाई, माजी सरपंच विनायक उर्फ अब्जू सावंत, तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष सावंत, विष्णू सावंत, सहदेव सावंत, अनिल सावंत, सिताराम सावंत आदींसह ओवळीये ग्रामस्थ उपस्थित होते.

डॉ चंद्रकांत सावंत यानी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक अशा ७८ शाळांमधील १३० विद्यार्थीनी कायमस्वरूपी दत्तक घेत ४ लाख ७ हजार रुपये कायमस्वरूपी देणगी दिली. या देणगीच्या व्याजातून दरवर्षी त्या त्या शाळेतील एकूण १३० मुलींचा कायमस्वरुपी शैक्षणिक खर्च करण्यात येणार आहे. तसेच डॉ चंद्रकांत सावंत यांनी गेली दोन दशके विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा उपक्रमांसाठी स्वतः पदरमोड करून लाखो रुपये खर्च केले आहेत. आर्थिक परिस्थिती अभावी कर्ज फेडू न शकलेल्या फणसवडे गावातील १६ महिलांचे एकूण ५ लाख ३५ हजार ५२५ रुपयाचे कर्ज डॉ चंद्रकांत सावंत यांनी स्वतः भरून या महिलांना त्यांनी कर्ज मुक्त केले. यांनी गेल्या दोन दशकात समाज हितासाठी त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा ओवळीयेवा सियांच्यावतीने सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here