सावंतवाडी,दि.१२: खासदार विनायक राऊत व शैलेश परब यांच्या सौजन्याने तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पुरस्कृत श्री मालोबा वॉरियर्स संघ कलंबिस्त राऊळवाडी यांच्यावतीने दिनांक १३ ते १५ जानेवारी दरम्यान श्री देव मालोबा चषक २०२४ पर्व ४, या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक १२ जानेवारी रोजी सायंकाळी चार (०४) वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १८०२४ व आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक ११०२४ व आकर्षक चषक तर तृतीय व चतुर्थ येणाऱ्या संघांना आकर्षक चषक,त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सर्वाधिक षटकार,उत्कृष्ट जेल, मालिकावीर,इम्पॅक्ट प्लेअर, उत्कृष्ट षटक,शिस्तबद्ध संघ अशी विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत.
तरी सर्व संघ मालकांनी आपला संघ वेळेत घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन श्री देव मालोबा वारियर्स ग्रुप यांनी केले आहे.



