सावंतवाडी,दि.०४: तालुक्यातील युवा विकास प्रतिष्ठान सांगेली यांच्या मार्फत रविवार दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक या दरम्यान आरोग्यवर्धिनी केंद्र सांगेली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या शिबिराला रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन युवा विकास प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.
गेली सात वर्षे अविरहित पणे युवा विकास प्रतिष्ठान च्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.