शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांची माहिती
सावंतवाडी,दि.१५: शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या सतत प्रयत्नाने सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये, सांगेली, सावरवाड सहयाद्री पट्टयातील एप्रिल २३ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस/ वादळ परिस्थितीमध्ये नुकसान झालेल्या ३६८ शेतकऱ्यांचे शेती/ बागायतीचे पंचनामे करण्यात आले होते. त्यापैकी ३२२ शेतकऱ्यांना १३ लाख ५२ हजार एवढी नुकसान रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा झालेली असून, उर्वरीत शेतकऱ्यांची नुकसान भरपाई लवकरच बँक खाती जमा होणार आहे. तसेच दोडामार्ग तालुक्यातील ३८ शेतकऱ्यांचे शेती/ बागायतीचे पंचनामे करण्यात आले होते. त्यापैकी ६ शेतकऱ्यांना २२ हजार ७७५ नुकसान रक्कम शेतकऱ्यांच्या खाती जमा झालेली असून उर्वरीत शेतकऱ्यांची नुकसान भरपाई लवकरात लवकर बँक खाती जमा होणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
अशी माहीती सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी दिली आहे.